Suryatech Solar Systems: Your trusted provider of premium solar products in Pune, India.
Experience over 20 years of expertise and ISO 9001:2008 certification.
Unlock the power of reliable and sustainable solar solutions for a brighter future.
आवाहन
महावितरण कडून वीज नियामक आयोग यांचे कडे दाखल केलेल्या याचिके अंतर्गत, महावितरण कडून सर्वच स्तरावरील सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या आणि भविष्यात असे प्रकल्प उभारू इच्छिणाऱ्या ग्राहकांकडून “ग्रिड सपोर्ट चार्जेस” (GSC) या नावाखाली किमान रु. ४.०० ( लघु दाब प्रकल्प ) ते रु. ८.०० ( ऊच्च दाब प्रकल्प) प्रती युनिट अशी अवाजवी दरवाढ प्रस्तावित केली आहे. वास्तविक सर्वच सौर ऊर्जेचा वापर करणारे ग्राहक हे वीज बिलामध्ये बचत व्हावी या हेतूने स्वत:च्या खर्चाने ,स्वत:च्या जागेत स्वत:च्या वापरासाठी, स्वत:ची आर्थिक गुंतवणूक करून हे प्रकल्प उभे करीत असतात. त्यांच्याच पैशावर त्यांनी निर्माण केलेल्या या विजेच्या वापरावर अशी जाचक दरवाढ सुचवून भविष्यात कुणी असे प्रकल्प उभारू नयेत अशीच एक दुर्दैवी नीती अवलंबविण्याचे धोरण पुरस्कृत करू पाहत आहे.
अशा प्रकारची जाचक आणि केवळ अतर्क्य अशी ही दरवाढ ही ग्राहकहिताच्या दृष्टीने योग्य नाही. आज सर्वच स्तरांवर सौर ऊर्जेच्या वापरासाठी सर्व नागरिक , सर्व वीज ग्राहक प्रयत्नशील आहेत. देशामध्ये अशा प्रकारची दर आकारणी ही कुठल्याच इतर राज्यात अस्तित्वात नाही . अशा प्रकारचे नवीन आणि अप्रस्तुत दरवाढ ही ग्राहकांवर लादण्याचे आणि सौर उर्जेचा वापराला खीळ घालण्याचे षडयंत्र पुढे येत आहे.
या संबंधात मी सौर ऊर्जा संघटनेचा प्रतिनिधि या नात्याने महावितरणचे सर्व ग्राहक आणि सौर ऊर्जेचे महत्त्व जाणणारे नागरिक या सर्वाना आवाहन करू इच्छितो की या धोरण विरुध्य समस्त नागरिकांचा , सौर उत्पादक निर्मात्यांचा दिनांक ३ फेब्रुवारी २०२० रोजी निषेध मोर्चा व दिनक ४,५,६ फेब्रुवारी २०२० आयोजित केलेल्या साखळी उपोषणात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे . त्याशिवाय वीज नियामक आयोगाने या संदर्भात आयोजित सार्वजनिक सुनावणी ( Public Hearing) साठी सुद्धा उपस्थित रहावे आणि आपल्या न्याय्य हक्कांचे धोरण अधिकाराने आग्रहाने मांडावे.
आपला सहभाग हा पुढील आपल्या पिढी साठी त्यांच्या उज्ज्वल भवितव्य साठी तर संतुलित पर्यावरण धोरणा साठी आवश्यक ठरणार आहे .
महाराष्ट्र सोलर मँन्युफँक्चरर असोसिएशन .
Join our YouTube channel for solar insights, tips, and a greener future.
Subscribe now for high-quality solar energy!
Contact us :-
Suryatech Solar Systems,
www.suryatechsolarsystems.in
www.suryatechsolarsystems.com
Tel: 020 25455141/ 25468191
Mob:- +91 9421016381, +91 9422089111
Youtube :
https://www.youtube.com/watch?v=FeRbP0II934